✍️ -- दि.9 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी --
1) कायदेशीर साक्षरता नसणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कायदेशीर सेवा दिन 9 नोव्हेंबर रोजी पाळला जातो. या दिवशी, 1995 मध्ये, कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा लागू करण्यात आला.
2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये सुमारे 614 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास केले.
3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलवाहतूक मंत्रालयाचे नाव बदलून बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय केले.
4) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे इटालियन समकक्ष ज्युसेपे कॉन्टे यांच्यात व्हर्च्युअल द्विपक्षीय शिखर परिषदेनंतर भारत आणि इटली यांनी विविध क्षेत्रातील 15 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
5) जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ पांगोंग त्सो मार्गावर आता टॅन्गटसे येथे 4 जी सेवा मिळतात.
6) भारताचा पहिला सौर-आधारित एकात्मिक मल्टी-व्हिलेज पाणीपुरवठा प्रकल्प (IMVWSP) केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी अरुणाचल प्रदेशातील लोकांना समर्पित केला.
7) मच्छीमारी समुदायाचे जीवनमान उंचावण्यासाठी केरळ सरकारने ‘परिवर्तनार्थ’ हा अग्रगामी पर्यावरण-टिकाऊ कार्यक्रम लॉंच केला आहे.
8) खेल मंत्रालयाने खेळो इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून सहा केंद्रांना मान्यता दिली आहे.
9) जम्मू-काश्मीर प्रशासनाचे स्थान असणारी नागरी सचिवालय जम्मूमध्ये ‘दरबार मूव्ह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रशासित प्रदेशातील जवळपास 150 वर्ष जुन्या प्रथेचा भाग म्हणून सहा महिन्यांपर्यंत उन्हाळ्याची राजधानी श्रीनगरमध्ये काम केल्यानंतर जम्मूमध्ये उघडेल.
10) 1 डिसेंबर, 2017 पूर्वी विकल्या गेलेल्या वाहनांच्या चारचाकी वाहनांच्या श्रेणीसाठी फास्टॅग अनिवार्य असेल.
✍️ -- दि.10 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी --
■ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन,तर उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस.
● अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन व उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी सोमवारी अमेरिकेतील करोना संदर्भातील टास्क फोर्सची निर्मिती केली.तर विशेष म्हणजे या टास्क फोर्सचे नेतृत्व करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तीन सह अध्यक्षांमध्ये एका भारतीय वंशाच्या समावेश आहे.करोना टास्क फोर्सचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तीन सह अध्यक्षांवर असणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर विवेक मूर्ती यांच्यासह येल विद्यापीठातील औषधी विभागाचे सहयोगी प्राध्यापक मार्सेला नुनेझ-स्मिथ व अन्न व औषध प्रशासन विभागचे माजी आयुक्त डेव्हिड केसलर यांचा समावेश आहे.तसेच करोना टास्क फोर्समधील 13 सदस्यांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये प्रख्यात आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे.
● ‘फायझर’ची करोना लस 90 टक्के परिणामकारक :-->
.जगभर आतापर्यंत सुमारे 10 लाख लोकांचा बळी घेणाऱ्या करोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत दिलासादायक माहिती फायझर कंपनीने सोमवारी दिली. कंपनीने तयार केलेली लस 90 टक्के परिणामकारक ठरू शकते, असे कंपनीने सांगितले.तसेच फायझर आणि तिची जर्मन सहयोगी कंपनी बायोएनटेक यांनी ही लस संयुक्तपणे तयार केली आहे. ती 90 टक्के परिणामकारक ठरू शकेल, असे प्राथमिक निष्कर्ष असल्याचे फायझर कंपनीने सांगितले.तर लशीचा उपयोग 16 ते 85 वयोगटातील लोकांवर तातडीने करण्यासाठी या महिनाअखेरीस अमेरिकेच्या नियंत्रकांकडे अर्ज करण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत.
■ केंद्रीय कार्यालयांत मराठी भाषा आता सक्तीची :-->
केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांत इंग्रजी व हिंदीबरोबरच स्थानिक भाषा म्हणजेच मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक केले आहे.तर ते न करणारे कार्यालय जिल्ह्यात आढळल्यास त्याच्या प्रमुखास निमंत्रक करून त्यास पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मराठीचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे लक्षात आणून देणे आवश्यक आहे.तसेच यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी भाषा संचालनालयास अहवाल देण्याचे आदेश राज्य शासनाने 6 नोव्हेंबर रोजी जारी केले आहेत.राज्यातील केंद्र शासनाच्या राजभाषा विभागाने हिंदी व इंग्रजीबरोबर प्रादेशिक मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.यानुसार, राज्यासह जिल्ह्यातील केंद्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंद्रीय आस्थापनांच्या कार्यालयांत मराठी भाषेचा वापर करण्यात येतो यावर लक्ष केंद्रित करून अहवाल तयार करण्याच्या कामासाठी जिल्हा व तालुका स्तरावर गट-ब च्या दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांमधून एका समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक आदेशही आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.
◆ इस्कॉनला मिळाला ग्रीन चॅम्पियन पुरस्कार :-->
ग्रीन बिल्डिंग काँग्रेसच्या नुकत्याच आयोजित झालेल्या अठराव्या आवृत्तीत इस्कॉनला यंदाचा ग्रीन चॅम्पियनशिप पुरस्कार जाहीर झाला आहे.जनतेला निसर्गाविषयी संवेदनशील बनविण्यासाठी सतत अग्रणी राहिल्याने इस्कॉन या संस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.तर इस्कॉन गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरंगा दास यांनी हा पुरस्कार स्वीकारला.तसेच यावेळी ते म्हणाले की येत्या काळात इस्कॉनच्या वतीने भक्तिवेदांत संशोधन केंद्राच्या विद्यापीठाची रचना व बांधकाम ग्रीन कॅम्पस या संकल्पनेवर आधारित करण्यात येणार आहे. इस्कॉनची जगभरातील 700 मंदिरं उपासनेची ग्रीन केंद्रे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी इस्कॉनची आंतरराष्ट्रीय ग्रीन कमिटी आयजीबीसीबरोबर कार्यरत आहे.
✍️ -- दि.11 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी --
★ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डी.लिट पदवी प्रदान-->
सार्वजनिक जीवनात गेली 60 वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी एका विशेष दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली.जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.विनोद टिब्रेवाला यांनी विद्यापिठाच्या उपक्रमांची माहिती दिली.तर यावेळी राजस्थानी सेवा संस्थेचे विश्वस्त रमाकांत टिब्रेवाला, सुनिल पटोडीया, विनोद दालमिया, वनश्री वालेचा उपस्थित होते.
● 23 नोव्हेंबरपासून शाळांची घंटा वाजणार :-->
राज्याच्या शाळांतील 9 वी ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.तर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांकडून लेखी संमती गरजेची असेल. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाआड अर्ध्या वर्गाला बोलवायचे असून (50 टक्के ऑनलाइन, 50 टक्के प्रत्यक्ष) एक बाकावर एकच विद्यार्थी बसवण्यात येणार आहे.तसेच शाळेमध्ये थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी या सर्वांची उपलब्धता असणे आवश्यक असेल.वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण, अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे. शाळेतील क्वारंटाइन सेंटर दुसरीकडे नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवण्याचे निर्देश आहेत.
■ NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत राखली सत्ता :-->
बिहारमध्ये NDA ची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे.बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व 243 जागांचे निकाल हाती असून NDA ने 125 जागा मिळवल्या आहेत.तर या 125 जागांमध्ये 74 जागा भाजपाने, 43 जागा जदयूने तर मित्र पक्षांनी 8 जागांवर विजय मिळवला आहे.दुसरीकडे महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
◆ चिनी कोविड लशीच्या चाचण्या ब्राझीलमध्ये स्थगित :-->
चीनच्या कंपनीने तयार केलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लशीच्या चाचण्या ब्राझीलमध्ये थांबवण्यात आल्या आहेत.‘करोनाव्हॅक’ असे या लशीचे नाव असून त्याच्या चाचण्या थांबवण्यात आल्याचे ‘अॅनव्हिसा’ संकेतस्थळावर सोमवारी म्हटले आहे.तर लस निर्मितीत सहभागी असलेल्या भागीदारांकडून लशीच्या चाचण्या स्थगित करण्याबाबत शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत पण या लशीमुळे अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर बनल्याचे समजते.‘करोनाव्हॅक’ लशीची निर्मिती सिनोव्हॅक कंपनीने केली असली तरी ब्राझीलमध्ये साव पावलोतील बुटँटन इन्स्टिटय़ूटने लशीचे उत्पादन केले आहे.
★ पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धात मेदवेदेवला जेतेपदासह चौथे स्थान :-->
रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत जागतिक क्रमवारीत प्रथमच चौथे स्थान मिळवले.चौथे स्थान मिळवताना मेदवेदेवने विक्रमी 20 ग्रॅँडस्लॅम विजेत्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररला मागे टाकले.मेदवेदेवने अंतिम फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हवर 5-7, 6-4, 6-1 असा विजय मिळवला. पहिला सेट गमावूनही मेदवेदेवने ही बाजी मारली.त्याचे हे या वर्षांतील पहिले विजेतेपद ठरले.
➡️स्त्रोत--> https://www.mpscworld.com/11-november-2020-current-affairs-in-marathi/amp/
➡️संकलन--> निलेश पाटील
(संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो.9503374833
No comments:
Post a Comment