स्पर्धा परीक्षासंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या 'परीक्षा विश्व' ब्लॉगला भेट द्या

Sunday, November 22, 2020

1) 📚 इ.5 वी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या मुलांसाठी 27/09 आजचाOnline free class "📚


🔺 रेषाखंड,त्रिकोण,कोन,आयत,चौकोन आणि चौरस मोजूया काही क्षणात


👉अवघड आकृत्या मोजायला शिकूया नवीन Tricks ने.


📏आकृती कशीपण असू द्या.30 सेकंदात त्यातील आकृत्या मोजूया.


📋परीक्षेत आलेले प्रश्न स्पष्टीकरणासह पाहूया.


👉👉खालील बटनवर क्लिक करून video पाहा आणि share करा.

👇👇👇👇👇👇👇

अगोदरचे ☝️☝️☝️online class चे video पण येथेच पाहा.


🙏विजयकुमार अशोक नरवणे 

📱संपर्क  :9673655213


*2) 🌐 महाराष्ट्र शिक्षक पॕनल आयोजित इ.5 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी online class🌐*


*🔥4,5,9,7 हे दिलेले 4 अंक पण यापासून मोठयात मोठी 8 अंकी संख्या कशी बनवायची ?🔥*


*3,8,7 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज 30 सेकंदात कशी करायची ?*


*☝️☝️या सर्व प्रश्नाचे उत्तर  एकाच video मध्ये स्पष्टीकरणासह पाहा.*

*👉👉खालील बटनवर क्लिक करून video पाहा इतरांना share करा.*

👇👇👇👇👇👇


*🙏विजयकुमार अशोक नरवणे🙏*


*3) 📚 "महाराष्ट्र शिक्षक पॕनल" आयोजित इ.5 वी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या मुलांसाठी Online free class📚*


*🔥मोठ्या संख्यांचे विभाजक सोप्या पद्धतीने कसे काढायचे  ?ते पाहूया.🔥*


*🟣विभाजकतेच्या कसोट्या Tricks ने समजून घेऊया.*


*📋परीक्षेत आलेले प्रश्न स्पष्टीकरणासह पाहूया.*


*👉👉👉खालील link वर video पाहा आणि share करा.*

👇👇👇👇👇👇👇

*अगोदरचे ☝️☝️☝️online class चे video पण येथेच पाहा.*

*📱संपर्क  :9673655213*

*🙏विजयकुमार अशोक नरवणे🙏*


*4) 🔥गुणाकार करणे झाले आता सोपे.🔥*


*💥सर्व Tricks पाहूया एकाच video मध्ये.*


*👨‍👩‍👦‍👦तुम्ही पाहा आणि इतरांना share करा तसेच तुम्हाला पण इ.5 वी online class जो free आहे त्याला join व्हायचे असेल तर channel subscribe करा.दररोज 11 वाजता online class असतो.*


*👉👉खालील link वर video पाहा.*

👇👇👇👇👇👇👇👇

*🙏विजयकुमार अशोक नरवणे🙏*


*5)📚☀️ स्पर्धा परीक्षेला विद्यार्थी बसलेला असेल तर हा video दाखवाच☀️*


*☀️"मोठ्या संख्यांचा वर्ग 30 सेकंदात करूया."💥*


*🔥'वर्ग" या घटकावर मुख्य परीक्षेत येणारे विविध प्रश्नांचे स्वरूप स्पष्टीकरणासह पाहूया.*


*संख्येचा वर्ग काढणे या घटकावर आधारित शाब्दिक उदाहरणे पाहूया.*


*📚प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरण येथे मिळेल.तुम्ही video पाहा आणि उद्या होणाऱ्या इ.5वी च्या online class मध्ये सकाळी 11 वाजता सामील व्हा.*


*👉खालील link मध्ये video पाहा .*

👇👇👇👇👇👇👇👇

*📚काही अडचण वाटल्यास संपर्क करा.*

👇👇👇👇

*📱 9673655213*

*🙏विजयकुमार अशोक नरवणे🙏*


*🌐6) प्रत्येक स्पर्धा परीक्षेला येणारा प्रश्न .🌐*

👇👇👇👇👇👇👇👇

*💥2,4,6 हे अंक प्रत्येकी एकदाच घेऊन तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती येईल?*

*🔥फक्त 20 सेकंदात सोडवूया अशा प्रकारची प्रश्न .🔥*


*☀️उभी मांडणी आणि बेरीज करायची गरज नाही.☀️*


*☄️उत्तर पण ☑️☑️अचूक येणार ते पण कमी⏱️ वेळेत.*


*📚स्पर्धा परीक्षेत वेळ वाचण्यासाठी सोपी Tricks.*


*📹video आवडल्यास इतरांना share करा.*

*👉👉खालील you tube channel वर video पाहा तसेच तिथेच playlist मध्ये इतर सोप्या Tricks चे video पाहा.*

👇👇👇👇👇👇👇

*🙏विजयकुमार अशोक नरवणे सर🙏*

📱 मो.9673655213

संकलन-निलेश पाटील सर

Wednesday, November 11, 2020

चालू घडामोडी,दि.9 नोव्हेंबर 2020 ते 11 नोव्हेंबर 2020

 


✍️ -- दि.9 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी --

1) कायदेशीर साक्षरता नसणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कायदेशीर सेवा दिन 9 नोव्हेंबर रोजी पाळला जातो. या दिवशी, 1995 मध्ये, कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा लागू करण्यात आला.


2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये सुमारे 614 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास केले.


3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलवाहतूक मंत्रालयाचे नाव बदलून बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय केले.


4) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे इटालियन समकक्ष ज्युसेपे कॉन्टे यांच्यात व्हर्च्युअल द्विपक्षीय शिखर परिषदेनंतर भारत आणि इटली यांनी विविध क्षेत्रातील 15 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.


5) जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ पांगोंग त्सो मार्गावर आता टॅन्गटसे येथे 4 जी सेवा मिळतात.


6) भारताचा पहिला सौर-आधारित एकात्मिक मल्टी-व्हिलेज पाणीपुरवठा प्रकल्प (IMVWSP) केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी अरुणाचल प्रदेशातील लोकांना समर्पित केला.


7) मच्छीमारी समुदायाचे जीवनमान उंचावण्यासाठी केरळ सरकारने ‘परिवर्तनार्थ’ हा अग्रगामी पर्यावरण-टिकाऊ कार्यक्रम लॉंच केला आहे.


8) खेल मंत्रालयाने खेळो इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून सहा केंद्रांना मान्यता दिली आहे.


9) जम्मू-काश्मीर प्रशासनाचे स्थान असणारी नागरी सचिवालय जम्मूमध्ये ‘दरबार मूव्ह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रशासित प्रदेशातील जवळपास 150 वर्ष जुन्या प्रथेचा भाग म्हणून सहा महिन्यांपर्यंत उन्हाळ्याची राजधानी श्रीनगरमध्ये काम केल्यानंतर जम्मूमध्ये उघडेल.


10) 1 डिसेंबर, 2017 पूर्वी विकल्या गेलेल्या वाहनांच्या चारचाकी वाहनांच्या श्रेणीसाठी फास्टॅग अनिवार्य असेल.

✍️ -- दि.10 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी --

■ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन,तर  उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस.

● अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन व उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी सोमवारी अमेरिकेतील करोना संदर्भातील टास्क फोर्सची निर्मिती केली.तर विशेष म्हणजे या टास्क फोर्सचे नेतृत्व करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तीन सह अध्यक्षांमध्ये एका भारतीय वंशाच्या समावेश आहे.करोना टास्क फोर्सचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तीन सह अध्यक्षांवर असणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर विवेक मूर्ती यांच्यासह येल विद्यापीठातील औषधी विभागाचे सहयोगी प्राध्यापक मार्सेला नुनेझ-स्मिथ व अन्न व औषध प्रशासन विभागचे माजी आयुक्त डेव्हिड केसलर यांचा समावेश आहे.तसेच करोना टास्क फोर्समधील 13 सदस्यांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये प्रख्यात आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे.

● ‘फायझर’ची करोना लस 90 टक्के परिणामकारक :-->

.जगभर आतापर्यंत सुमारे 10 लाख लोकांचा बळी घेणाऱ्या करोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत दिलासादायक माहिती फायझर कंपनीने सोमवारी दिली. कंपनीने तयार केलेली लस 90 टक्के परिणामकारक ठरू शकते, असे कंपनीने सांगितले.तसेच फायझर आणि तिची जर्मन सहयोगी कंपनी बायोएनटेक यांनी ही लस संयुक्तपणे तयार केली आहे. ती 90 टक्के परिणामकारक ठरू शकेल, असे प्राथमिक निष्कर्ष असल्याचे फायझर कंपनीने सांगितले.तर लशीचा उपयोग 16 ते 85 वयोगटातील लोकांवर तातडीने करण्यासाठी या महिनाअखेरीस अमेरिकेच्या नियंत्रकांकडे अर्ज करण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत.

■ केंद्रीय कार्यालयांत मराठी भाषा आता सक्तीची :-->

केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांत इंग्रजी व हिंदीबरोबरच स्थानिक भाषा म्हणजेच मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक केले आहे.तर ते न करणारे कार्यालय जिल्ह्यात आढळल्यास त्याच्या प्रमुखास निमंत्रक करून त्यास पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मराठीचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे लक्षात आणून देणे आवश्यक आहे.तसेच यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी भाषा संचालनालयास अहवाल देण्याचे आदेश राज्य शासनाने 6 नोव्हेंबर रोजी जारी केले आहेत.राज्यातील केंद्र शासनाच्या राजभाषा विभागाने हिंदी व इंग्रजीबरोबर प्रादेशिक मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.यानुसार, राज्यासह जिल्ह्यातील केंद्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंद्रीय आस्थापनांच्या कार्यालयांत मराठी भाषेचा वापर करण्यात येतो यावर लक्ष केंद्रित करून अहवाल तयार करण्याच्या कामासाठी जिल्हा व तालुका स्तरावर गट-ब च्या दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांमधून एका समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक आदेशही आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.


◆ इस्कॉनला मिळाला ग्रीन चॅम्पियन पुरस्कार :-->

ग्रीन बिल्डिंग काँग्रेसच्या नुकत्याच आयोजित झालेल्या अठराव्या आवृत्तीत इस्कॉनला यंदाचा ग्रीन चॅम्पियनशिप पुरस्कार जाहीर झाला आहे.जनतेला निसर्गाविषयी संवेदनशील बनविण्यासाठी सतत अग्रणी राहिल्याने इस्कॉन या संस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.तर इस्कॉन गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरंगा दास यांनी हा पुरस्कार स्वीकारला.तसेच यावेळी ते म्हणाले की येत्या काळात इस्कॉनच्या वतीने भक्तिवेदांत संशोधन केंद्राच्या विद्यापीठाची रचना व बांधकाम ग्रीन कॅम्पस या संकल्पनेवर आधारित करण्यात येणार आहे. इस्कॉनची जगभरातील 700 मंदिरं उपासनेची ग्रीन केंद्रे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी इस्कॉनची आंतरराष्ट्रीय ग्रीन कमिटी आयजीबीसीबरोबर कार्यरत आहे.

✍️ -- दि.11 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी --

★ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डी.लिट पदवी प्रदान-->

सार्वजनिक जीवनात गेली 60 वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी एका विशेष दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली.जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.विनोद टिब्रेवाला यांनी विद्यापिठाच्या उपक्रमांची माहिती दिली.तर यावेळी राजस्थानी सेवा संस्थेचे विश्वस्त रमाकांत टिब्रेवाला, सुनिल पटोडीया, विनोद दालमिया, वनश्री वालेचा उपस्थित होते.


● 23 नोव्हेंबरपासून शाळांची घंटा वाजणार :-->

राज्याच्या शाळांतील 9 वी ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.तर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांकडून लेखी संमती गरजेची असेल. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाआड अर्ध्या वर्गाला बोलवायचे असून (50 टक्के ऑनलाइन, 50 टक्के प्रत्यक्ष) एक बाकावर एकच विद्यार्थी बसवण्यात येणार आहे.तसेच शाळेमध्ये थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी या सर्वांची उपलब्धता असणे आवश्यक असेल.वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण, अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे. शाळेतील क्वारंटाइन सेंटर दुसरीकडे नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवण्याचे निर्देश आहेत.


■ NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत राखली सत्ता :-->

बिहारमध्ये NDA ची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे.बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व 243 जागांचे निकाल हाती असून NDA ने 125 जागा मिळवल्या आहेत.तर या 125 जागांमध्ये 74 जागा भाजपाने, 43 जागा जदयूने तर मित्र पक्षांनी 8 जागांवर विजय मिळवला आहे.दुसरीकडे महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

◆ चिनी कोविड लशीच्या चाचण्या ब्राझीलमध्ये स्थगित :-->

चीनच्या कंपनीने तयार केलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लशीच्या चाचण्या ब्राझीलमध्ये थांबवण्यात आल्या आहेत.‘करोनाव्हॅक’ असे या लशीचे नाव असून त्याच्या चाचण्या थांबवण्यात आल्याचे ‘अ‍ॅनव्हिसा’ संकेतस्थळावर सोमवारी म्हटले आहे.तर लस निर्मितीत सहभागी असलेल्या भागीदारांकडून लशीच्या चाचण्या स्थगित करण्याबाबत शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत पण या लशीमुळे अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर बनल्याचे समजते.‘करोनाव्हॅक’ लशीची निर्मिती सिनोव्हॅक कंपनीने केली असली तरी ब्राझीलमध्ये साव पावलोतील बुटँटन इन्स्टिटय़ूटने लशीचे उत्पादन केले आहे.


पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धात मेदवेदेवला जेतेपदासह चौथे स्थान :-->


रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत जागतिक क्रमवारीत प्रथमच चौथे स्थान मिळवले.चौथे स्थान मिळवताना मेदवेदेवने विक्रमी 20 ग्रॅँडस्लॅम विजेत्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररला मागे टाकले.मेदवेदेवने अंतिम फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हवर 5-7, 6-4, 6-1 असा विजय मिळवला. पहिला सेट गमावूनही मेदवेदेवने ही बाजी मारली.त्याचे हे या वर्षांतील पहिले विजेतेपद ठरले.

➡️स्त्रोत--> https://www.mpscworld.com/11-november-2020-current-affairs-in-marathi/amp/

➡️संकलन--> निलेश पाटील
(संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो.9503374833

Sunday, November 8, 2020

चालू घडामोडी

 


👉 दि.5 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी->

★ मुंबईत उघडकीस आलेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूरचित्रवाणी गुणांक पद्धतीचा (टीआरपी) फेरआढावा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने बुधवारी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी हेम्पती यांची चार सदस्यीय समिती स्थापन केली.तर ही समिती दोन महिन्यांत मंत्रालयाला अहवाल सादर करेल. त्यानंतर टीआरपीसंदर्भातील नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.पैसे देऊन एखाद्या दूरचित्रवाणी वाहिन्यांचा टीआरपी वाढवण्याचा गैरप्रकार समोर आला असून त्याची व्याप्ती देशभर असण्याची शक्यता मानली जाते.या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने आत्तापर्यंत दहा जणांना अटकही केली असून काही वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.तसेच या घोटाळ्याची गंभीर दखल घेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सध्या अमलात आणल्या जात असलेल्या ‘टीआरपी’ पद्धतीतील त्रुटी, त्यातील पळवाट, संभाव्य गैरव्यवहार आदी विविध मुद्यांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.टीआरपीची विद्यमान यंत्रणा (रेटिंग एजन्सी) 2014 मध्ये प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कार्यरत आहे. गेल्या सहा वर्षांत दूरचित्रवाणी क्षेत्रात झालेल्या बदलानुरूप रेटिंग व्यवस्थेतही सुधारणा करण्याची गरज आहे.


👉 भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आणखी तीन राफेल विमानं दाखल :-->

■ तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी आज भारतात दाखल झाली. गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमानं उतरली. यापूर्वी पंजाबमधील अंबालामध्ये पाच राफेल विमानांची पहिली बॅच दाखल झाली होती.भारताने फ्रान्सकडून एकूण 36 राफेल विमानं खरेदी केली आहेत. ती टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत आहेत. आत्तापर्यंत एकूण आठ विमानं भारतात आली आहेत.तर 29 जुलै रोजी पाच राफेल विमानांचा पहिला जत्था अंबाला एअरबेसवर दाखल झाला होता. अबुधाबीतील अल ढफरा एअरबेसवर एक थांबा घेत ही विमानं भारतात दाखल झाली होती. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी एका औपचारिक कार्यक्रमात ही विमान भारतीय हवाई दलात दाखल झाली होती.दरम्यान,हवाई दलाच्या माहितीनुसार आज आलेल्या तीन राफेल विमानांनी मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. प्रवासादरम्यान फ्रान्सच्या आणि भारताच्या विमानांद्वारे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. हवाई दलाला प्रत्येक दोन महिन्यांनंतर तीन ते चार राफेल विमानं दिली जाणार आहेत.तसेच जून 1997 मध्ये रशियाच्या सुखोई-30 या लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात सामिल झाल्यानंतर 23 वर्षांनंतर राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्यात आली आहेत. या विमानांमुळे भारतीय हवाई दल अधिक आक्रमक होणार असून त्यांची क्षमताही वाढली आहे.


👉 अमेरिकेतील सहावीच्या अभ्यासक्रमात भारतीयाच्या जीवनावर आधारित धडा :-->

◆ भारताचे वनपुरुष म्हणजेच ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जादव यांनी एकट्याने संपूर्ण जंगल उभारलं आहे असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. पायेंग यांच्या या कामाची दखल आता थेट पाश्चिमात्य देशांकडून घेण्यात येत आहे. नुकताच अमेरिकेतील एका अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कार्याबद्दल माहिती देणाऱ्या एका धड्याचा समावेश करण्यात आला आहे.नेक्टीकटमधील ब्रिस्टोल येथील ग्रीन हिल्स स्कूलने सहावीच्या अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कामासंदर्भातील धड्याचा समावेश केला आहे. इकोलॉजी म्हणजेच पर्यावरणशास्त्रामध्ये या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. आता येथील मुलं पद्मश्री पुरस्कारप्राप्त पायेंग यांच्या कार्याबद्दल शिकणार आहेत.जगभरामध्ये पर्यावरणासंदर्भात अनेक गोष्टी घडत असतानाच वातावरणातील बदलांसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.पर्यावरणाबद्दल संवेदनशील राहण्यासंदर्भात लहान मुलांना शालेय वयामध्येच शिक्षण देण्याच्या उद्देशाने जगभरामध्ये प्रयत्न सुरु आहेत. अशा मुलांसमोर वयाच्या 16 वर्षापासूनच पर्यावरण संरक्षणाचे काम करणाऱ्या पायेंग यांच्यापेक्षा अधिक चांगले उदाहरण कोणाचे असू शकते. पायेंग यांच्या कार्याने मुलांनाही प्रेरणा मिळेल या उद्देशाने त्यांच्या आयुष्यावरील धड्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.जादव यांनी एकट्याने उभ्या केलेल्या जंगलाला मोलाईचे जंगल असं म्हणतात.या जंगलाचा आकार न्यू यॉर्कमधील सेंट्रल पार्कपेक्षाही मोठा आहे. हे जंगला आता बंगाल टायगर, भारतीय गेंडे, वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 100 हून अधिक प्रजातीची हरणं आणि ससे यांचा अधिवास आहे.

👉 मार्लन सॅम्यूएल्सची निवृत्ती :-->


● वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लन सॅम्यूएल्स याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडिजने जिंकलेल्या दोन्ही ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सॅम्यूएल्सने सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या.सॅम्यूएल्स डिसेंबर 2018मध्ये अखेरचा सामना खेळला असून त्याने आपला निवृत्तीचा निर्णय जून महिन्यातच वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला कळवला होता. मंडळाचे अध्यक्ष जॉनी ग्रेव्ह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.तर 39 वर्षीय सॅम्यूएल्सने 79 कसोटी, 207 एकदिवसीय आणि 67 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 11 हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा काढल्या असून 150 बळीही मिळवले आहेत.


👉 आयसीसी क्रमवारीत कोहली,रोहितची मुसंडी :-->

■ भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये अव्वल दोन स्थानांवर कायम आहेत.कोहली (871) अग्रस्थानी असून रोहित (855) दुसऱ्या स्थानावर आहे. करोना साथीमुळे एकदिवसीय क्रिकेट गेल्या सात महिन्यांपासून कोहली आणि रोहितने खेळलेले नाही. मात्र तरीदेखील अव्वल दोन स्थाने त्यांना राखता आली आहेत.कोहली आणि रोहित वगळता भारताचा एकही फलंदाज अव्वल 10 जणांमध्ये नाही. गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमरा (719) दुसऱ्या स्थानी कायम आहे. बुमरा वगळता भारताचा एकही गोलंदाज अव्वल 10 मध्ये नाही.तर ‘आयसीसी’ सांघिक क्रमवारीत इंग्लंड अव्वल स्थानी कायम असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

👉 दि.6 नोव्हेंबर 2020 -->

◆ चीनने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे.तर इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी असून करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंबंधी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यानुसार, भारतात असणाऱ्या चिनी दुतावासाकडून व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही.तसेच आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. 3 नोव्हेंबर नंतर व्हिसा दिलेल्यांना कोणताही अडथळा येणार नाही.हा निर्णय फक्त भारतापुरता मर्यादित नसून याआधी इतर देशांसंबंधीही असा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून चीन पावलं उचलत आहे.भारताशिवाय ब्रिटेन, बेल्जिअम आणि फिलिपाइन्समधून नागरिकांनाही चीनमध्ये प्रवेशबंदी आहे. याशिवाय फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतील नागरिकांना प्रवेश करण्याआधी वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करण्याचा आदेश आहे.

👉 पर्यायी ऊर्जेचा वाटा 40 टक्के करण्याचे लक्ष्य :-->

● पॅरिस करारानुसार 2100 पर्यंत तापमानातील वाढ दोन अंश सेल्सिअसपर्यंत सीमित राखण्यासाठी देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात धोरणात्मक निर्णय घेतले असून कार्बन उत्सर्जनदेखील 35 टक्क्यांनी कमी केले जाईल, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी ‘इंडिया सीईओ फोरम’च्या पर्यावरण बदलासंदर्भातील कार्यक्रमात दिली.तर जगभरातील विविध देशांनी एकत्रितपणे पर्यावरणातील बदलांची गती कमी करण्यासाठी ‘पॅरिस करार’ केला आहे.त्याअंतर्गत तापमानातील वाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ नये, हा प्रमुख उद्देश ठेवण्यात आला आहे.तसेच अमेरिकेने मात्र या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

👉 मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार :-->

●  महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला.तर इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार तांदलवाडी जि. जळगाव येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकर, अचलपूर व किरण मोरे, अमरावतीयांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे.तसेच महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे 2019 पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.यंदाच्या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. यावर्षी 34 वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे 2021 मध्ये आहे. या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले जाणार आहे.

👉 ऑनलाइन वर्गाला फक्त पाच दिवस दिवाळीची सुट्टी :-->

★ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ते सुरू होते. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.मात्र राज्य सरकारने 12 ते 16 नोव्हेंबर अशी फक्त पाच दिवसच ऑनलाईन वर्गाला सुट्टी जाहीर केली. तसेच शाळांना पूर्वी दिवाळीची सुट्टी 21 दिवस होती. त्यांनतर वार्षिक सुट्ट्या 80 ऐवजी 76 करण्यात आल्याने दिवाळी सुट्टी 18 दिवस केली. पण कोरोनामुळे अभ्यास उशिरा सुरू झाल्याने दिवाळी सुट्टीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकात ही सुट्टी फक्त पाच दिवसांची केली.

-- 👉 7 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी -->

■ दिवाळीनंतर म्हणजे 16 नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये आणि शिक्षण संस्था प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिली.तसेच राज्यात ‘पुनश्च हरिओम’नंतर वाहतुकीची साधने, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृहे, बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे, यातही प्राधान्याने दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.तर सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविल्या आहेत.

👉 कामकाज सल्लागार समितीचे मुनगंटीवार अध्यक्ष :-->

● महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.तर भाजपचे नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच उर्वरित 16 समित्यांपैकी सात समित्यांचे अध्यक्षपद शिवसेनेला, पाच समित्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर चार समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे.लोकलेखा समितीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे असते.भाजपने त्यासाठी मुनगंटीवार यांचे नाव पूर्वीच दिलेले होते.राज्याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरीक्षक यांच्या अहवालांची तपासणी करणे हे महत्त्वाचे काम समिती करते.

👉 दिवाळीत फटाक्यांवर बंदी दिल्ली सरकारकडून निर्णय जाहीर :-->

●दिल्ली सरकारने दिवाळीत फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे.करोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा आणि रुग्णालयांमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला.तर याआधी राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि हरियाणा या राज्यांनीही फटाक्यांवर बंदी घातली आहे.तसेच सध्या सुरु असलेला सणांचा हंगाम आणि प्रदूषण यामुळे दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि दंडाधिकाऱ्यासोबत करोना आढावा बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.


👉 भारतीय वंशाच्या प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात :-->

★ न्यूझीलंडच्या संसदेत भारतीय भाषेचा आवाज घुमला आहे. याचं महत्वाचं कारण ठरल्या आहेत प्रियांका राधाकृष्णन. मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात झाला आहे.तर गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला.त्यावेळी प्रियांका राधाकृष्णन यांचा मल्याळीतून बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.प्रियांका राधाकृष्णन यांचा जन्म भारतातला. त्यानंतर त्या सिंगापूरला राहिल्या. प्रियांका राधाकृष्णन या आता न्यूझीलंडच्या नागरिक आहेत. लेबर पार्टीच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या. आता पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळालं आहे.


👉 केनचा 200 वा गोल,टॉटनहॅमचा विजय :-->

◆ हॅरी केनने 200वा गोल झळकावत टॉटनहॅमच्या युरोपा लीग फुटबॉलमध्ये लुडोगोरेट्सवर मिळवलेल्या 3-1 अशा विजयात योगदान दिले.तसेच टॉटनहॅमने याबरोबरच स्पर्धेत ‘ग’ गटात सहा गुणांसह अव्वल स्थान मिळवले.तर टॉटनहॅमकडून 300 वी लढत खेळणाऱ्या केनने योग्य ठरवला. त्याने 13व्या मिनिटाला गोल साजरा केल्यानंतर 43व्या मिनिटाला त्याच्याच पासवर लुकासने गोल केला.


👉 -- 8 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी -->

● भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यावर्षीचं पहिलं सॅटलाईट आज लाँच करणार आहे. इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून 10 सॅटलाईट लाँच केली जाणार आहेत.तर आज दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी ही सॅटलाईट अवकाशात झेपावतील.इस्रोनं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पोलर सॅटलाईट लाँच वेहिकलची (PSLV-C49) ही 51 वी मोहीम असणार आहे. याद्वारे इस्रो EOS-01 प्रायमरी सॅटलाईट म्हणून आणि 9 इंटरनॅशनल कस्टमर सॅटेलाईट लाँच करणार आहे.तसेच EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटलाईट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालिन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात येणार आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला आहे.अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हे अर्थ अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाइटचेच आधुनिक व्हर्जन आहे. याद्वारे ढगांच्या आडूनही पृथ्वीवरचे फोटो सुस्पष्टरित्या टिपता येणार आहेत.

👉 भारतीय वंशाच्या कमला हॅरीस होणार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष :-->

★ अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर जो बायडन यांनी बाजी मारली असून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, लवकरच जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवतील.तर दुसरी विशेष बाब म्हणजे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना संधी मिळणार आहे. कमला हरीस यांची उपराष्ट्राध्यक्षपदासाठी निवड झाली आहे.कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली होती. आता डेमोक्रेटीक पक्षाने अमेरिकेतील निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यामुळे कमला हॅरीस यांनाही उपराष्ट्रपती पदाचा सन्मान मिळणार आहे.तसेच अमेरिकेतील या महत्त्वाच्या पदासाठी निवडणूक लढवणारी पहिली कृष्णवर्गीय महिला म्हणून कमला हॅरीस मैदानात उतरल्या होत्या. कमला हॅरीस यांचं मूळ भारतीय असून भारताशी त्यांचं जवळचं नातं आहे.

👉 ‘पीएजीडी’चा मोठा निर्णय जम्मू-काश्मीरमधील ‘डीडीसी’निवडणूक लढवणार :-->

●'पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’ (पीएजीडी)च्या सदस्यांच्या आज झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण व मोठा निर्णय घेण्यात आला.पिपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशनने जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदांची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे, यासाठी सर्व स्थानिक पक्षांना सोबत घेतलं जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.'पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’ चे नेते सज्जाद लोन यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती देताना सांगितले की, या संदर्भात जम्मूमधील अनेक राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात आलेली आहे.बैठकीत डीडीसी निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. पीएजीडीच्या मते सर्व राजकीय पक्ष मिळून डीडीसी निवडणूक लढतील. जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या एकसारख्या भावना आहेत.दरम्यान, जम्मू-काश्मीरचे राज्य निवडणूक आयुक्त केके शर्मा यांनी 20 जिल्हा विकास परिषदांसाठी निवडणुकीची व पंचायतींच्या पोटनिवडणुकांची घोषणा केलेली आहे.तर डीडीसी निवडणूक 28 नोव्हेंबर पासून 22 डिसेंबरपर्यंत आठ टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. कलम ३७० हटवण्यात आल्यापासूनची ही मोठी राजकीय घडामोड आहे.

👉 अमिरातीमध्ये मुस्लीम वैयक्तिक कायदे शिथिल :-->

◆ अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा, मद्यावरील निर्बंध शिथिल करणे आणि तथाकथित ‘ऑनर किलिंग’ हा गुन्हा ठरवणे अशारितीने देशाच्या इस्लामी वैयक्तिक कायद्यांमध्ये मोठे बदल करण्यात आल्याचे संयुक्त अरब अमिरातींनी (यूएई) शनिवारी जाहीर केले.तर देशाची कायदा यंत्रणा इस्लामी कायद्यांच्या कठोर अशा अंमलबजावणीवर आधारित असताना, अशाप्रकारच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विस्तारातून देशाचे बदलते रेखाचित्र प्रतिबिंबित झाले आहे. देशातील वेगाने बदलणाऱ्या समाजासोबत वाटचाल करण्याच्या अमिरातीच्या राज्यकर्त्यांच्या प्रयत्नांचेही या बदलांमध्ये प्रतिबिंब उमटले आहे.यूएई व इस्रायल यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने या दोन देशांमध्ये झालेल्या करारानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.तसेच कायद्यातील या सुधारणांची घोषणा ‘डब्ल्यूएएम’ या सरकारी वृत्तसंस्थेमार्फत करण्यात आली व तिचे तपशील सरकारशी संलग्न असलेल्या ‘दि नॅशनल’ या वर्तमानपत्रात जाहीर करण्यात आले.21 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांनी मद्यपान करणे, विक्री आणि मद्य बाळगणे यांसाठी असलेली दंड आकारण्याची तरतूद या बदलांन्वये रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी मद्य खरेदी करणे, त्याची वाहतूक आणि मद्य घरात ठेवणे यांसाठी परवाना आवश्यक होता. नव्या नियमामुळे मुस्लिमांना मद्यप्राशनाची, अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

👉 अमेरिकेच्या अध्यक्षपदी बायडेन :-->

● विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना चीतपट करून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पेनसिल्वेनियातील 20 निर्णायक प्रातिनिधिक मतांच्या जोरावर शनिवारी रात्री बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आले.तर चार दिवसांपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले. बायडेन यांना 273, तर ट्रम्प यांना 214 मते पडली.

🌐 स्त्रोत-
https://www.google.com/amp/s/www.mpscworld.com/category/current-affairs/amp/

✍️ संकलन--> निलेश पाटील सर
    (संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
  📱 मो.9503374833

Wednesday, November 4, 2020

चालू घडामोडी,3 नोव्हेंबर 2020

 


🕑📺-- चालू घडामोडी,3 नोव्हेंबर 2020 --📺🕑

👉 चालू महिन्यात मलबार नौदल व्यायामाची 24 वी आवृत्ती दोन टप्प्यात नियोजित आहे.

👉 मिशन सागर-II. चा भाग म्हणून भारतीय नौदल जहाज, ऐरावत पोर्ट सुदानला पोहोचले.

👉 राजस्थान विधानसभेने राजस्थान महामारी रोग (सुधारणा विधेयक 2020) मंजूर केले असून मास्क घालणे बंधनकारक आहे.

👉 महाराष्ट्र कॅडर 1988 च्या तुकडीच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी राजीव जलोटा यांची केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्ट (MbPT) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

👉 पोर्तुगालचे श्री. दुर्ते पाशेको 2020-2023 या कालावधीसाठी आंतर संसदीय संघटनेचे (आयपीयू) अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.

👉 छत्तीसगडमध्ये आदिवासी बस्तर विभागात दंतेवाडा जिल्ह्यात 27 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

👉 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी 10 दिवसांची विशेष मोहीम राबविली.

👉 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घोषणा केली की  महिला T20 चॅलेंज 2020चे शीर्षक प्रायोजक रिलायन्स जिओ असेल.

👉 ज्येष्ठ राजकारणी आणि तुर्कीचे माजी पंतप्रधान मेसुत येल्माझ यांचे निधन झाले आहे. ते 73 वर्षांचे होते.

👉 प्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन. कृष्णन यांनी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला. ते 91 वर्षांचे होते.

स्त्रोत--> https://www.google.com/amp/s/majhinaukri.in/current-affairs-03-november-2020/amp/

संकलन- निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो-9503374833

 


🕑📺 --चालू घडामोडी,2 नोव्हेंबर 2020-- 📺🕑

👉करोना संकट असतानाही ऑक्टोबरमध्ये जमा झालेल्या वस्तू आणि सेवा कराने (जीएसटी) गेल्या आठ महिन्यांत प्रथमच एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला.गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमधील ‘जीएसटी’पेक्षा ही वाढ 10 टक्के अधिक आहे.अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये एक लाख पाच हजार 155 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला असून फेब्रुवारीनंतर प्रथमच एवढा मोठा अर्थदिलासा मिळाला आहे.तसेच 31ऑक्टोबपर्यंत 80 लाख जीएसटीआर-3बी विवरणपत्रे भरण्यात आल्याचेही अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.ऑक्टोबर 2020 मध्ये जमा झालेल्या एक लाख पाच हजार 155 कोटी रुपयांच्या जीएसटीमध्ये ‘सीजीएसटी’ 19,193कोटी, ‘एसजीएसटी’ 5,411 कोटी, ‘आयजीएसटी’ 52,540कोटी आणि 8,011 कोटी सेसचा समावेश आहे.

👉'वन नेशन,वन गोल्ड’ योजना लागू होण्याची शक्यता:-->

संपूर्ण देशात लवकरच ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे. या व्यवस्थेनुसार, देशातील कोणत्याही राज्यात सोन्याचा एकसारखाच भाव असेल.देशभरात ही व्यवस्था आणण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे.ज्वेलर्स असोसिएशनची मागणी आहे की, सरकारने देशात ‘वन नेशन,वन गोल्ड’ ही व्यवस्था आणावी.यामुळे ग्राहकाला देशभरात सर्व ठिकाणी एकाच किंमतीत सोनं उपलब्ध होईल.सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की, वाढत्या दराने सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.त्यामुळे एकच किंमत सर्व जागी लागू झाली तर याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. ते कुठल्याही राज्यातून सोन खरेदी करु शकतात.

👉नँटिस (फ्रान्स) येथे झालेल्या अ‍ॅलेक्सिस व्हॅस्टिने बॉक्सिंग स्पर्धेत जागतिक रौप्यपदकविजेता अमित पंघाल (52 किलो), आशीष कु मार (75 किलो) आणि संजीत (91 किलो) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आणि राष्ट्रकु ल रौप्यपदक विजेत्या अमितने अमेरिकेच्या रेने अब्राहमला 3-0 अशी धूळ चारली.भारतीय खुल्या बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संजीतने फ्रोन्सच्या सोहेब बौफियाचे आव्हान मोडीत काढले.आशियाई रौप्यपदक विजेत्या आशीषला अमेरिकेचा प्रतिस्पर्धी जोसेफ ग्रेरामी हिक्सने दुखापतीमुळे माघार घेतल्याने विजेता ठरवण्यात आले.आशियाई रौप्यपदक विजेत्या कविंदर सिंग बिश्तला 57किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

स्त्रोत--> https://www.mpscworld.com/2-november-2020-current-affairs-in-marathi/

संकलन - निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो.9503374833

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड.

 ✍️ बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय...