-- भारताचा इतिहास,भाग.2.आधुनिक भारत --
११ व्या शतकात इराणमधील अरब सेनापती मोहम्मद बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व तेथील दाहीर राजाचा पराभव करुन तो प्रांत काबीज केला.यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली.भारतातील अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणांत सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत.गझनी येथील एका महमूद नावाच्या राज्यकर्त्याने भारतात लुटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या.मंगोल सम्राट तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.अफगाण शासक महंमद घोरीने भारतावर आक्रमण केले.अजयमेरुचा (आजचे अजमेर) एक राजपूत राजा पृथ्वीराज चौहानशी त्याचा संघर्ष झाला.आठ युध्दानंतर पृथ्वीराज चौहानचा मृत्यू झाला.महंमद घोरीने कुतूबुद्दीन ऐबक या आपल्या गुलामास भारतातील जिंकलेल्या मुलूखाचा सुभेदार म्हणून नेमले.महंमद घोरी नंतर अफगाणिस्तानात परत निघून गेला.महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतूबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित केले.त्याच्या वारसदारांनी पुढील काही वर्षे भारतावर राज्य केले.नंतर त्याचा सेनापती जलालुद्दीन खिलजीने त्याच्या विरुध्द उठाव करून सत्ता हस्तगत केली.१३व्या शतकात त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजीने त्याची कपटाने हत्या केली आणि तो शासक बनला. त्याने अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत शासन केले.
यात राजस्थानमधील चित्तोडचा राजपूत राजा रतनसिंग व राणी पद्मावतीचा इतिहास न विसरण्यासारखा आहे.दिल्ली सल्तनत ते मोघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या.महाराष्ट्रात हसन गंगू बहामनी याने बहामनी साम्राज्याची स्थापना केली.उत्तर कर्नाटकाचा काही भागदेखील या साम्राज्यात समाविष्ट होता.बहामनी साम्राज्यात आणि विजयनगर साम्राज्यात संघर्ष होता.पुढे बहामनी साम्राज्याची पाच शकले झाली.
अहमदनगरची निजामशाही,विजापूरची
आदिलशाही,गोवळकोंड्याची कुतूबशाही,एलिचपूरची (आजचे अचलपूर) इमादशाही,बिदरची बरीदशाही अशी ती पाच राज्ये निर्माण झाली होती.त्यांच्यातही साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत असत.या पाचपैकी चार राज्यांनी विजयनगरवर हल्ला करून त्याचा अंत केला.आपापसांतील सत्तासंघर्षात त्यांच्यापैकी एलिचपूर आणि बिदर ही राज्ये कालौघात नष्ट झाली.मुघल बादशाहा शाहजहानने अहमदनगरची निजामशाही जिंकून घेतली.मुघल आणि दक्षिण भारतातील इस्लामी राज्ये यांच्यात साम्राज्य-विस्तारासाठी संघर्ष होत.मुघल राजवटीत काही राजपूत राज्यांनी मुघलासमोर आव्हान उभे केले. पंजाबात महाराज रणजितसिंगच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याची स्थापना झाली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा स्वराज्याची महाराष्ट्रात स्थापना झाली.ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन:प्रस्थापन करणे हा होता. शहाजहानचा पुत्र मुघल सम्राट आलमगीर औरंगजेबाच्या म्रुत्युनंतर मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व दक्षिण भारतातील विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही तर इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज या तीन परकीय सत्तांचा प्रतिकार केला.त्यापैकी कुतूबशाही आणि फ्रेंचांशी त्यांनी मैत्री करार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबच्या नेतृत्वाखाली मुघलानी मराठा राज्यावर आक्रमण केले केला.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलाबरोबर संघर्ष केला.
औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारले.छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी नेतृत्व केले.मुघल सेनापती दिलेरखानाने मराठ्यांची राजधानी असलेला रायगडाला वेढा घालून जिंकल्यामुळे राजारामाना रायगड सोडून जिंजीला पलायन करावे लागले.प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजारामाचा मृत्यू झाला.औरंगजेबाने संभाजीची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू यांना कैद केले.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी मुघलांनी शाहूची व येसूबाईची मुक्तता केली.शाहू व राजारामाची पत्नी ताराबाई यांच्या युध्दात शाहूने ताराबाईचा पराभव केला.मराठा राज्याची वाटणी झाली.त्यानंतर पेशव्यांनी हळूहळू मराठा साम्राज्याचा विस्तार सुरु केला.मराठेशाहीनंतर पेशवे आले आणि त्यांनी आपली मुख्य राजधानी पुण्यात वसवली. महाराष्ट्रात पेशवाईची स्थापना झाली.पेशवे मराठेशाहीचे सत्ताधीश बनले.पहिले बाजीराव पेशवे एक कर्तबगार राजकारणी होते.त्याचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते.पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र असलेल्या नानासाहेबांच्या काळात अफगाण शासक अहमदशहा अब्दालीशी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात दारूण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले.त्याचा सर्वाधिक फायदा युरोपियन साम्राज्यवाद्यांना झाला.सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते.
इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच,डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सद्देगिरी,फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली.बंगालपासून सुरुवात करत कर्नाटकातील म्हैसूरचा सुल्तान हैदर अली व त्याचा मुलगा टिपू सुलतान,१८१८ मध्ये मराठा साम्राज्य,१८५० च्या सुमारास पंजाबमधील शीख साम्राज्य व जाट साम्राज्ये असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले.ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पर्यायाने इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण केले.फ्रेंचानी डिचेरी व चंद्रनगर व पोर्तुगीजांनी पाँडिचेरी, गोवा,दीव,दमण आणि दादरा आणि नगर हवेली हस्तगत केले.भारतातील त्यांची मांडलिक संस्थाने दत्तक वारस नामंजूर करुन खालसा केली.१८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारकडे गेला.
इ.स. १९३७ साली महात्मा गांधी सोबत पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली.१९२० मध्ये टिळकांच्या मृत्युनंतर गांधींनी चळवळीची सुत्रे हाती घेत अंहिसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या.तसेच काही सशस्त्र क्रांतीकारी संघटनाही उभ्या राहिल्या.सरतेशेवटी दुसऱ्या महायुद्धानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे व्हावे लागले.फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.आधुनिक भारताचे निर्माते व अद्वितीय बहुआयामी विद्वान असलेल्या कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या तब्येतीची पर्वा न करता अत्यंत मेहनतीने ३ वर्षामध्येच जगातील सर्वात महान व मोठे असे भारताचे संविधान लिहिले.घटनाकार बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय राज्यघटना’ संविधान समितीला सुपूर्द केली.आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटनेची अंमलबजावणी सुरू झाली,भारत गणतंत्र राष्ट्र बनले व जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र अशी आज बिरुदावली मिरवत आहे.भारत संघराज्य बनले.
भारतात १९५६ नंतर भाषावार प्रांतरचना झाली.
फ्रान्सने आपल्या ताब्यातील भारतीय वसाहती वसाहती-मध्ये सार्वमत घेऊन भारताकडे सोपवल्या.पोर्तुगीजांशी भारताला लढावे लागले.१९६१मध्ये भारताने आपले लष्कर पाठवून गोवा,दीव,दमण आणि दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केले.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली.जम्मू आणि काश्मीर,पंजाबमध्ये १९८० च्या दशकात झालेला हिंसाचार व ईशान्येकडील आसाम,मणिपूर,मिझोराम,नागालैंड राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरिबीमुळे आदिवासी भागांत सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारतातील आतंकवाद/दहशतवाद ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे.१९९० पासुन भारतातील विविध शहरात आतंकवादी/दहशतवादी हल्ले झाले आहेत.भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून १९६२,१९४७, १९६५,१९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली.भारत अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य आहे.इ.स.१९७४ आणि १९९८ मध्ये भारताने राजस्थानातील पोखरण येथे भूमिगत अणुचाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून स्वतःला एक आण्विक शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगीकार केल्यानंतर झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे.
संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
📱मो.9503374833