स्पर्धा परीक्षासंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या 'परीक्षा विश्व' ब्लॉगला भेट द्या

Tuesday, September 29, 2020

-- भारताचा इतिहास,भाग.1.प्राचीन भारत --

 


   -- भारताचा इतिहास,भाग.1.प्राचीन भारत --      

              भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन
देशांमध्ये गणला जातो.येथील लिखित इतिहास 
२,५०० वर्षांपूर्वीचा असून इतर पुराव्यांनुसार भारतात ७०,००० वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्त्व आणि इतिहास आहे. भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये 
प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय. 
मौर्य साम्राज्य ज्याला गुप्त राज्य असेही म्हटले जाते.हे भारतातील पहिले प्रभावी असे केंद्रीय शासन होते. भारतामध्ये सत्ताही मोठ्या काळापर्यंत टिकून राहिली देशातील ती पहिली केंद्रीकृत अशी सत्ता होते.या काळामध्ये राज्यकर्त्यांनी मोठा भूप्रदेश आपल्या अंमलाखाली आणला आणि प्रजा कल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
                     मध्य प्रदेशातीलभिमबेटका येथील 
पाषाणयुगातील भित्तिचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत.पुराणतज्ज्ञांनुसार आदि-
मानवाने भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी प्रवेश केला. साधारणपणे ९,००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण 
व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व सिंधू नदीच्या काठावर त्याचे हळूहळू सिंधू संस्कृतीत 
रूपांतर झाले.इ.स.पू ३५०० चा सुमार सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो.या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली.मोहेंजोदडो व हडप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. ह्या शहरांचा शोध दयारामजी साहनी यांनी लावला.काही इतिहासकार मान्य करतात की युरोप व मध्य आशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व त्यानंतर वैदिक काळ सूरू झाला.पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन हडप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठिय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब,राजस्थान व कच्छ,
 गुजरातमधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून ते पूर्वेला बिहार,बंगाल,ओडिशा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेत महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती.आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापलेला होता.
संस्कृत,पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात ग्रिक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते त्यातील काही जण पदांमध्ये राजेशाही ही अस्तित्वात नव्हती,तर काही जणांमध्ये मात्र गणराज्य व्यवस्था होती.त्याकाळी अशी १६ जनपदे अस्तित्वात आलेली होती.गणराज्य असलेल्या जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तीची गणपरीषद असे परिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारास संबंधीचे निर्णय घेत असत.अशा चर्चा ज्या ठिकाणी होत त्या सभागृहाला संतागार असे म्हटले जाई."गौतम बुद्ध" 
नेपाळमधील शाक्य गणराज्यातील राजपुत्र होते. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी प्रचलनात होते.जन पदांच्या संदर्भातला उल्लेख हा तत्कालीन प्राचीन धार्मिक साहित्यामधून येतो यामध्ये बौध्द धर्मातील 'त्रिपिटक' आणि जैन धर्मातील ग्रंथ यामध्ये जनपदांचा व गणराज्यांचा उल्लेख आलेला आहे.
             कोसल महाजनपदाचाविस्तार हिमालयाच्या 
पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता.या राज्यातील श्रावस्ती कुशावती 
आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती.श्रावस्ती हे कौसल महाजनपदाची राजधानी होती.गौतम बुद्ध श्रावस्थीमध्ये 'चेतवणी' या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते.कोसल राजा प्रसेनजीत हा वर्धमान महाविर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले.
                  कोसलप्रमाणेच वत्स,अवंती आणि मगध हीदेखील मोठी महाजनपदे अस्तित्वात होती.मगधच्या उत्तरेस लिच्छविचे वृज्जी हे गणराज्य होते.वैशाली ही त्याची राजधानी होती.मगधचा राजा अजातशत्रूने लिच्छवी राज्य जिंकून ते मगधामध्ये
विलीन करून घेतले.वत्स महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयागच्या आसपासच्या प्रदेशात झालेला होता कोसम म्हणजेच प्राचीन काळाचे 
कौशांबी होईल.हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार 
बांधले होते.राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता.राजा उदयन नंतर वत्स महाजन पदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही.ते अवंती महाजन पदाच्या राजाने जिंकून घेतले प्राचीन भारताच्या इतिहासात पदांची स्थान हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहे.या काळातील जनपदांच्या उदयातूनच सार्वभौम सत्ता ह्या आकाराला आल्या व त्याच्या प्रदेशांमध्ये 'क्या' सत्तांचा मोठा विस्तार घडून आला.अनेक वैभव संपन्न असे राज्य देशांमध्ये आकाराला आले.
            इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ग्रिक 
सम्राट सिंकदर (अलेक्झांडर) च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली.सिकंदराने गंगेच्या 
खोऱ्यापर्यंतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक क्षात्रप म्हणजे सुभेदार नेमले.भारतामधून निघून गेल्यानंतर ग्रिसमध्ये त्याचा म्रुत्यू झाला.सिकंदराच्या म्रुत्युनंतर ग्रीकाच्या ताब्यात असणार्या भारतीय प्रदेशात उठाव सुरु झाले.भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते.चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्यांच्या साथीने /मदतीने मगधच्या 
मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.त्याआधी त्याने मगधमधील नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंदाचा 
पराभव केला. तिचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू सम्राट अशोकाचे कळस गाठला.भारताच्या पश्चिम सीमेपर्यत त्याचा विस्तार झाला.कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
             भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता.अशोकाच्यानंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्ववान नसल्याने मौर्य साम्राज्याचे पतन सुरु झाले.शेवटचा मौर्य सम्राट ब्रुहतदाता याची त्याचा सेनापती पुष्यमित्र शुग याने हत्या केली आणि शुग घराण्याची सत्ता स्थापन केली.पुढे काही काळानंतर शुग घराण्याचा मंत्री वासुदेव कण्व याने शुग घराण्याच्या राजाची हत्या केली आणि कण्व 
घराण्याची सत्ता स्थापन केली.मौर्य साम्राज्याच्या
पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले.सातवाहनांची सत्ता आणि साम्राज्य स्थापन झाले.हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला बौद्ध 
धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपांत पुनर्बांधणी झाली.
                 महाराष्ट्रातील प्रतिष्ठान (आजचे पैठण) ही त्यांची राजधानी होती. इ.स.९ व्या शतकाच्या सुमारास उत्तर प्रदेशात गुर्जर-प्रतिहाररांची राजवट स्थापन झाली.कन्नोज ही त्यांची राजधानी होती.साहित्य,
गणित,शास्त्र,तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली.
             भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील पांड्य,चोल साम्राज्य,
चेरा,विजयनगरचे साम्राज्य / राज्य,महाराष्ट्रातील 
सातवाहन,यादव,विदर्भ या काळातील कला,स्थापत्य-
शास्त्रातील प्रगती आजही खुणावते.अजिंठा,वेरूळ,
हंपीचे प्राचीन नगर,दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली. चोल साम्राज्याचा विस्तार
आग्नेय आशियातील इंडोनेशियापर्यंत पोहोचला होता.चालुक्य,राष्ट्रकूट,परमारकाकतेय,होयसळ राज्ये उदयास आली.ग्रीकाप्रमाणेच शक,हूण,कुषाणांनीही 
भारतावर आक्रमणे केली.मध्य प्रदेशातील खजुराहो 
येथील चंडेल राजपूत राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत.

👉स्त्रोत--> https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8

संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
📱मो.9503374833

No comments:

Post a Comment

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड.

 ✍️ बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय...